शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Congress President polls: खर्गे, थरूर की त्रिपाठी, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कोण? मधुसूदन मिस्त्री म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 19:51 IST

Congress President polls: आज तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे काँग्रेस निवडणूक संघटना प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत आहे. काँग्रेस पक्षात शुक्रवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाल्याने गदारोळ सुरू झाला आहे. दरम्यान, आज तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे काँग्रेस निवडणूक संघटना प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि केएन त्रिपाठी यांचा समावेश आहे. मात्र यापैकी कोणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. प्रत्येकजण स्वबळावर निवडणूक लढवत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सोनिया गांधी यांनी आपण कोणासोबत नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर असे कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही. गांधी परिवाराने कोणाच्याही उमेदवारीला दुजोरा दिलेला नाही.

मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून 14 अर्ज, शशी थरूर यांनी 5 आणि केएन त्रिपाठी यांनी 1 अर्ज दाखल केला आहे. उद्या आम्ही अर्ज तपासू आणि उद्या संध्याकाळी वैध अर्ज जाहीर करू. तसेच, उमेदवारी अर्जासोबतच उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. या 3 पैकी कोणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. ते स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. याचबरोबर, या संपूर्ण प्रक्रियेत आपण तटस्थ राहणार असल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आशीर्वाद आहेत असा कोणी दावा करत असेल तर ते चुकीचे आहे, असे मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले. 

तिसऱ्या नावाची चर्चाकाँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी रंजक बनत आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होईल, असे म्हटले जात होते. मात्र आता केएन त्रिपाठी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा कोणालाच अंदाज नव्हता. झारखंड सरकारचे माजी मंत्री केएन त्रिपाठीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. "मी आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, त्याचा आदर केला जाईल", असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्रिपाठी म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूर