शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 14:02 IST

मल्लिकार्जुन खर्गे यांना सरकारकडून औपचारिक निमंत्रण मिळाले आहे.

नवी दिल्ली:  भारताच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी 7 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडले. दरम्यान, राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेदेखील उपस्थित राहणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गेंना सरकारकडून अधिकृत निमंत्रणदेखील पाठवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते आणि मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर खर्गेंनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. 

यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण मिळालेले नाही, तर सर्व निमंत्रणे आंतरराष्ट्रीय नेत्यांना जात असल्याचा टोलाही लगावला होता. ते पुढे म्हणतात, 2024 च्या निवडणुका नरेंद्र मोदींचा नैतिक पराभव आहे. निवडणुकीत मोदी प्रमुख चेहरा होते, पण त्यांना फक्त 240 जागा मिळाल्या. पंडित नेहरुंना 1952, 1957, 1962 मध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळाले, 370 आणि त्याहून अधिक जागा मिळाल्या. गेल्या 10 वर्षात संसदेवर बुलडोझरचा वापर करण्यात आला. पुढे बघू काय होतंय. एनडीएत विरोधाभास आहे, जेडीयूला एक गोष्ट हवीये तर टीडीपीला दुसरंच काहीतरी हवंय, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7:15 वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले, मात्र यावेळी त्यांच्या जागांची संख्या 240 आली. लोकसभेतील बहुमताचा आकडा 272 आहे. नरेंद्र मोदींना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात मित्रपक्षांची साथ लागणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या शेजारील देशांचे नेतेही सहभागी होणार आहेत.

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी