शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी..."; संसदेत काँग्रेसच्या स्थितीवर मल्लिकार्जुन खर्गेंचा शायराना अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 19:11 IST

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, विरोधी पक्षाची संख्या कमी आहे, मात्र त्यांच्या अनुभवात आणि युक्तिवादात ताकद आहे. पण समस्या अशी आहे, की या ऐवजी संख्या मोजली जाते आणि विचारांकडे दुर्लक्ष केले जाते.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे राज्यसभेत स्वागत केले. या वेळी विरोधकांनी, आपल्याकडेही लक्ष असू द्यावे, असे आवाहन त्यांना केले. राज्यसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे उपराष्ट्रपतींचे स्वागत करताना म्हणाले, मला आशा आहे की आपण आमच्या भावना समजून घ्याल. आम्ही आपल्याला संपूर्ण सहकार्य करू. एवढेच नाही, तर यावेळी आपली व्यथा मांडताना, सभागृहात केवळ आकड्यांचीच भाषा समजली जाते आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या अनुभवाकडे, युक्तिवादाकडे आणि विचारांकडे लक्ष दिले जात नाही, असेही खर्गे म्हणाले.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, विरोधी पक्षाची संख्या कमी आहे, मात्र त्यांच्या अनुभवात आणि युक्तिवादात ताकद आहे. पण समस्या अशी आहे, की या ऐवजी संख्या मोजली जाते आणि विचारांकडे दुर्लक्ष केले जाते. सभागृहाच्या बैठका कमी झाल्याने दुर्बल घटकांतील लोकांना संवाद साधण्याची संधी कमी मिळते. काही वेळा विधेयकेही घाईघाईने मंजूर केली जातात. पूर्वी संसदेचे कामकाज वर्षभरात 100 दिवसांपेक्षाही अधिक चालायचे. मात्र, आता 60 ते 70 दिवसही चालू शकत नाही. सभागृहात बैठका झाल्या तर चांगले परिणाम येतील. या वेळी, काँग्रेसच्या स्थितीवर शायरान्या अंदाजात बोलताना त्यांनी विरोधकांना सल्लाही दिला.

पक्षाच्या स्थितीवर खर्गे म्हणाले... -मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाच्या स्थितीकडे इशारा करत म्हणाले, 'मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी.' यावेळी काँग्रेस अध्यक्ष खर्गे उपराष्ट्रपती यांना म्हणाले, की वरिष्ठ सभागृहाचे संरक्षक म्हणून आपली भूमिका इतर जबाबदाऱ्यापेक्षाही मोठी आहे. आपण भूमी पुत्र आहात आणि इथपर्यंत पोहोण्याचा प्रवास महत्वाचा आहे. आपल्याला संसदीय परंपरांची माहिती आहे. 9व्या लोकसभेत आपण निवडून आला होतात. आणि संसदीय कामकाज मंत्रालयात होते. आपण राज्यपालही राहिला आहात. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि राज्यांचे प्रतिनिधित्व करते. राज्यांचे राजकीय चित्र येथे दिसते. राज्यांतील अनेक दिग्गज नेत्यांनी या सभागृहाची शोभा वाढवली आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा