शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 06:04 IST

‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची शनिवारी आभासी बैठक पार पडली. त्यात खरगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यांच्या नावावर सर्व नेत्यांची सहमती झाल्याचे समजते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संयोजकपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली असली, तरी ‘इंडिया’तील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची शनिवारी आभासी बैठक पार पडली. त्यात खरगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. दुसरीकडे आघाडीत उत्तर व दक्षिण भारताच्या प्रतिनिधित्वाचे संतुलन साधण्यासाठी संयोजक म्हणून नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव आला, पण आपल्याला पदाची लालसा नसल्याचे सांगून नितीशकुमार यांनी ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांना संयोजकपद देण्याची सूचना केली.

बैठकीला अनुपस्थित नेत्यांसह आघाडीतील सर्व नेत्यांशी पुन्हा चर्चा करून लवकरच सर्वसंमतीने नितीशकुमार यांची निवड करण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नितीशकुमार यांनी संयोजकपद स्वीकारण्यास फारसे स्वारस्य दाखवले नसल्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. 

खरगे-केजरीवाल भेट‘इंडिया’ची बैठक संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. यावेळी राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि राघव चढ्ढा  उपस्थित होते. केजरीवाल यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी सायंकाळी मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि ‘आप’च्या नेत्यांची जागा वाटपाच्या मुद्यावर दुसरी आणि महत्त्वाची बैठक झाली होती. या भेटींमुळे काँग्रेस व आपमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.

बैठकीत जागा वाटपाच्या मुद्दयावर सकारात्मक चर्चा झाली. ‘भारत जोडो न्याय यात्रे’त ‘इंडिया’च्या नेत्यांनी सहभागी व्हावे.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

देशाला पर्याय देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी