शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Congress President Election: फायनल ठरली! काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी हे दोन नेते रिंगणात; तिसऱ्याचा अर्जच बाद झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 15:40 IST

Congress President Election Update: काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे, यामुळे त्याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याच्यावरून शह काटशहाचे राजकारण सुरु होते. या सर्व राजकारणाची आचा फायनल ठरली आहे. काँग्रेस हायकमांडचे विश्वासून मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे शशी थरूर असा हा सामना रंगणार आहे. तिसरे उमेदवार झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के एन त्रिपाठी यांचा अर्ज रद्द झाला आहे. 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे, यामुळे त्याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, तुर्तास तरी दोन्ही गट पाहता ही निवडणूक अटळ असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये 20 पैकी 4 फॉर्ममधील स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आल्याने ते नाकारण्यात आले आहेत. आता या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आमनेसामने असतील, असे ते म्हणाले. या दोन्हीपैकी एकानेही अर्ज मागे न घेतल्यास निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल, असेही ते म्हणाले. 

 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी झारखंडमधील काँग्रेस नेते केएन त्रिपाठी यांनीही शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह उमेदवारी दाखल केली होती. कृष्णानंद त्रिपाठी उर्फ ​​केएन त्रिपाठी हे राजकारणात येण्यापूर्वी ते हवाई दलात होते. लष्कराची नोकरी सोडून राजकारणात आले. 2005 मध्ये डाल्टनगंजमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 मध्ये पुन्हा डाल्टनगंजमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री करण्यात आले. २०१४ मध्ये ते पुन्हा पराभूत झाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूर