शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Congress President Election: चेन्नईत शशी थरुर यांना मोठा झटका! बैठकीसाठी ७०० पैकी १२ प्रतिनिधींची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 10:11 IST

देशात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. तब्बल दोन दशकानंतर काँग्रेसचे अध्यक्ष गांधी परिवारातील नसणार आहेत. या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्ज केले आहेत.

चेन्नई: देशात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. तब्बल दोन दशकानंतर काँग्रेसचे अध्यक्ष गांधी परिवारातील नसणार आहेत. या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्ज केले आहेत. शशी थरुर यांनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. काल ते तमिळनाडू येथे दौऱ्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या बैठकीला अनेक प्रतिनिधींनी गैरहजेरी लावली,  त्यामुळे आता थरुर यांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. 

काल गुरुवारी शशी थरुर चेन्नईमध्ये उपस्थित होते, यावेळी त्यांनी ७०० प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलवले होते. यात फक्त १२ प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. ही बैठक पक्षाचे मुख्यालय सथियामूर्ती भवन येथे आयोजित केली होती. 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी नागपुरातून खरगेंना पाठबळ

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात शशी थरुर निवडणूक लढवत आहेत. यातून अशोक गहलोत शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर शेवटच्या क्षणी खर्गे यांची एन्ट्री झाली आहे. 

चेन्नईत काल शशी थरूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला."जर ते माझ्या बैठकीला उपस्थित राहण्यास घाबरत असतील तर ते त्यांचे नुकसान आहे" "गांधी कुटुंबाने स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडे अधिकृत उमेदवार नाही. मल्लिकार्जुन खर्गे हे अधिकृत उमेदवार असल्याचा समज आम्ही दूर करू," असं शशी थरुर म्हणाले.

थरूर हे पहिलेच नेते आहेत, ज्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतरच त्यांनी ही घोषणा केली होती.

"सोनिया गांधी यांनीच त्यांना "निवडणूक लढण्यासाठी आपले स्वागत आहे" असे सांगितले होते. पक्षाकडे "अधिकृत उमेदवार" नसेल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब तटस्थ राहील, असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते, असंही थरूर म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरSonia Gandhiसोनिया गांधी