शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

काॅंग्रेस+प्रशांत किशाेर, रणनीतीकाही जमेना; पक्षप्रवेशाचा प्रस्ताव नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 07:59 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यशाची चव चाखता यावी यासाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकडे   चिंतन शिबिरापूर्वी संघटनेतील सक्षम कृतिगटाचे नेतृत्व सोपविण्याची तयारीही झाली.

शरद गुप्ता नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या चर्चांना अखेरीस मंगळवारी पूर्णविराम मिळाला. स्वत: किशोर यांनीच काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव नम्रपणे नाकारत असल्याचे ट्विट केले. त्यानंतर लगोलग काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या ट्वीटला दुजोरा दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यशाची चव चाखता यावी यासाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकडे   चिंतन शिबिरापूर्वी संघटनेतील सक्षम कृतिगटाचे नेतृत्व सोपविण्याची तयारीही झाली. परंतु या सर्व चर्चांना स्वत: किशोर यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला. त्या आशयाचे ट्विट किशोर यांनी केले.

कारणे काय?

किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाला पक्षातूनच विरोध होता. प्रशांत किशोर यांना पुढील लोकसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेसचे नेतृत्व आपल्या हाती हवे होते. सक्षम कृतिगटाचे अध्यक्षपदही त्यांना हवे होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर यांनी पक्ष संघटना आणि चार कोटी निष्ठावंत मतदारांची ओळख दर्शवणारी माहिती यांची मागणी पक्षाकडे केली होती. ही एक प्रकारची डेटा चोरी असू शकेल, अशी शंका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केली.

किशोर यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या प्रचाराची जबाबदारी ‘आय-पॅक’ या कंपनीकडे घेतली. यालाही काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून आक्षेप घेण्यात आला. सादरीकरणात किशोर यांनी ६०० स्लाइड्स दाखविल्या, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने काँग्रेस नेत्यांनी किशोर स्वत:च्या बढाईसाठी अपवृत्त पसरवत असल्याचा आरोप केला.यांचा होता विरोध : पी. चिदम्बरम, दिग्विजयसिंह, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मणिक्कम टागोर, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि राहुल गांधी यांची टीम- प्रियंका गांधी आणि त्यांच्या समर्थकांचा मात्र प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाला पाठिंबा होता.

संघटनात्मक अडचणीच्या खोलवर रूतलेल्या मुळांवर घाव घालण्यासाठी काँग्रेसला सक्षम नेतृत्व आणि इच्छाशक्ती यांची पक्षाला माझ्यापेक्षा नितांत गरज आहे. सक्षम कृतिगटाचा भाग म्हणून पक्षप्रवेशाबरोबरच निवडणुकांशी संबंधित जबाबदारी स्वीकारण्यासाठी पक्षाने देऊ केलेल्या प्रस्तावाला मी नम्रपणे नकार देतो. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस