शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी दिल्लीत काढणार न्याय यात्रा; काँग्रेस केजरीवाल-भाजपला करणार लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 15:13 IST

काँग्रेसकडून दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Congress Nyay Yatra : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती. आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा ठळकपणे मांडणार आहे.

काँग्रेसची न्याय यात्रा २३ ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २८ नोव्हेंबरला संपेल. काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान निघणार आहे. त्यानंतर ४ ते १० नोव्हेंबर,१२ ते १८ नोव्हेंबर आणि शेवटच्या टप्प्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत निघणार आहे.

यासोबतच मोदी सरकार, दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आप सरकार यांच्यातील वादावर देखील न्याय यात्रेतून प्रकाश टाकला जाणार आहे. केजरीवाल सरकार आणि आपचे मद्य धोरण प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

या यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे. आप सरकारवरला घेरण्यासाठी काँग्रेस पक्ष विविध मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात प्रदर्शनांचे आयोजन करणार आहे. याशिवाय विविध अहवालातून आलेली माहिती  लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. असं असले तरी केजरीवाल यांचा आप पक्ष केंद्रातील इंडिया आघाडीचा भाग राहणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुढच्या वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच नोव्हेंबरमध्ये दिल्लीत निवडणुका घेण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसोबतच येथेही निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले होते.

कशी असणार न्याय यात्रा?

पहिला टप्पा- २३ ते २८ ऑक्टोबरदुसरा टप्पा- ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरतिसरा टप्पा- १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरचौथा टप्पा- २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्लीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी