शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना अहवाल सादर; निवडणुकीत पराभवाची समीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:37 IST

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यांत काँग्रेसला मोठा फटका बसला.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यांत काँग्रेसला मोठा फटका बसला. या निवडणुकांतील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसने स्थापन केलेल्या पाच सदस्यांच्या समितीने आपला अहवाल पक्षाच्या  हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना सादर केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या समितीत पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि विंसेट पाला यांचा समावेश होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे या समितीचे नेतृत्व होते. समितीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुड्डुचेरीतील नेत्यांशी अनेक बैठका केल्या. अहवाल सादर करण्यासाठी या समितीला दोन आठवड्यांचा वेळ दिला गेला होता.या समितीतील माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे काँग्रेसच्या ‘जी २३’ समूहाचेही सदस्य आहेत. हा समूह संघटनात्मक निवडणूक आणि जबाबदारीसह उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) डिजिटल बैठकीत, निवडणूक निकालाच्या कारणांची माहिती मिळविण्यासाठी छोटी समिती तयार करण्यात यावी, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ठेवला होता.पश्चिम बंगालमध्ये खातेही उघडले नाही आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला पराभव पत्करावा लागला तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे खातेही उघडले नाही. तसेच पुड्डुचेरीतही काँग्रेसचा पराभव झाला. येथे निवडणुकीच्या काही दिवस आधीपर्यंत काँग्रेस सत्तेत होती. तामिळनाडू काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला, येथे द्रमुकसोबत असलेल्या त्यांच्या आघाडीला विजय मिळाला.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस