भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेस ठाम
By Admin | Updated: April 2, 2015 23:53 IST2015-04-02T23:53:05+5:302015-04-02T23:53:05+5:30
वादग्रस्त भू-संपादन विधेयकाविरोधात काँग्रेस ठाम आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे आणि म्हणून शेतकरीविरोधी असलेल्या

भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेस ठाम
नीमच (मप्र.) : वादग्रस्त भू-संपादन विधेयकाविरोधात काँग्रेस ठाम आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे आणि म्हणून शेतकरीविरोधी असलेल्या या विधेयकाला आमचा कायम विरोध राहील, अशी ग्वाही काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसमक्ष दिली.
सोनिया गांधी यांनी गुरुवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या मध्य प्रदेशातील अनेक गावांना भेट देत, येथील नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना, सरकारचे प्रस्तावित भू-संपादन विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा आरोप सोनियांनी केला. काँग्रेसचा विधेयकाला विरोध आहे आणि या मुद्यावर कुठलीच तडजोड केली जाणार नाही, असे सोनिया म्हणाल्या.
मी अनेक गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी कुठलाही भेदाभेद न करता, शेतकऱ्यांना मदत करावी. अद्यापही नुकसानीची पाहणी झालेली नाही, असे ते म्हणाल्या.(वृत्तसंस्था)