शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

Congress on PM Modi: 'निवडणूक जिंकण्यासाठी PM मोदींनी इस्रायलची मदत घेतली', काँग्रेसचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:13 IST

Congress: 'इस्रायली एजन्सीचे काम भाजपच्या आयटी सेलशी मिळते-जुळते आहे.'

Congress Attacks On PM Modi:काँग्रेसने नवी दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयात पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोपही केले. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते आणि पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी लोकशाहीशी खेळ करत असल्याची टीका केली. तसेच, निवडणुका जिंकण्यासाठी मोदी इस्रायली एजन्सीच्या मदतीने देशातील निवडणुकांवर प्रभाव टाकत असल्याचा खळबळजनक दावाही केला.

निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पंतप्रधान मोदी इस्रायलच्या एजन्सीची मदत घेत असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला आहे. पवन खेडा म्हणाले की, देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. इतर देशांना भेटून सरकारमध्ये बसलेले लोक देशाच्या लोकशाहीविरुद्ध षडयंत्र रचत आहे.

काय म्हणाले काँग्रेसचे प्रवक्ते?काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी दावा केला आहे की, इस्रायली कंत्राटदारांनी जगातील तीन निवडणुकांवर प्रभाव टाकला आहे. त्यांचे मुख्य काम खोटी माहिती पसरवणे आहे. या एजन्सीच्या खुणा भारतातही सापडल्या आहेत. सरकारच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही. खोटी माहिती पसरवण्याची त्यांची पद्धत भाजपच्या आयटी सेलशी मिळती-जुळती आहे.

भाजप राहुल गांधींविरोधात खोटं बोलत आहेकाँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते पुढे म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपच्या आयटी सेलने पाकिस्तान झिंदाबादचा नारा देणारी मुलगी राहुल गांधींना भेटल्याचा खोटा प्रचार केला. तसेच राहुल गांधींच्या एका वक्तव्याचा उदयपूर हत्याकांडाशी चुकीचा संबंध जोडण्यात आला होता. काँग्रेस प्रवक्त्यांनी पुढे आरोप केला की, नागालँडच्या विकासावर भाजपचे मोठे दावे वास्तवापासून दूर आहेत. ईशान्य राज्य अजूनही व्यापक बेरोजगारी, चांगले रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा यांच्या अभावाने ग्रासले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी