Congress on Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदू समुदायावरील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. बांगलादेशात दीपू चंद्र दास या हिंदू व्यक्तीची कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात निषेध आंदोलन सुरू असून, सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
प्रियंका गांधी मौन बाळगून
भाजपने काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधत आरोप केला आहे की, त्या केवळ गाझा प्रश्नावर बोलतात, मात्र बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात.
इमरान मसूद यांचा पलटवार
या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, मागील वेळी बांगलादेशात जे काही घडत होते, त्यावर सर्वाधिक आवाज प्रियंका गांधी यांनीच उठवला होता.
प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा
इमरान मसूद पुढे म्हणाले, प्रियंका गांधींना एकदा पंतप्रधान बनवून पाहा. त्या इंदिरा गांधींसारखेच कठोर उत्तर देतील. ज्या प्रकारे इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, त्याचप्रमाणे प्रियंका गांधीही बांगलादेशाला भारतविरोधी अड्डा बनू देणार नाहीत.
राहुल गांधींबाबतही स्पष्ट भूमिका
जर प्रियंका गांधी पंतप्रधान झाल्या, तर राहुल गांधी काय करतील? या प्रश्नावर इमरान मसूद यांच्या आवाजाचा सूर बदलला. ते म्हणाले, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वेगळे कुठे आहेत. ते इंदिरा गांधींचे नातू आहेत. दोघे एकाच चेहऱ्यावरील दोन डोळ्यांसारखे आहेत. दोघेही आमचे नेते आहेत.
केंद्र सरकारवर टीका
इमरान मसूद यांनी पंतप्रधानांवरही टीका करत म्हटले की, पंतप्रधान जेव्हा आसाम आणि बंगालला जातात, तेव्हा ते केवळ निवडणुकीचा अजेंडा राबवतात. मात्र बांगलादेशातून हिंदू निर्वासित भारतात येतात, तेव्हा सीमा बंद केल्या जातात. बांगलादेश हळूहळू भारतविरोधी अड्डा बनत चालल्याची खंत व्यक्त करत इमरान मसूद म्हणाले, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र जेव्हा प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातात देशाची सूत्रे येतील, तेव्हा संपूर्ण जग त्यांची भूमिका पाहील.
Web Summary : Amidst Bangladesh violence debate, Congress' Imran Masood advocates for Priyanka Gandhi as PM, citing her strong leadership. He asserts she would handle anti-India activities effectively, like Indira Gandhi. He avoids clarifying Rahul's role, stating party will decide.
Web Summary : बांग्लादेश हिंसा विवाद के बीच, कांग्रेस के इमरान मसूद ने प्रियंका गांधी को पीएम बनाने की वकालत की, उनकी मजबूत नेतृत्व क्षमता का हवाला दिया। उन्होंने कहा कि वह इंदिरा गांधी की तरह भारत विरोधी गतिविधियों से प्रभावी ढंग से निपटेंगी। राहुल की भूमिका पर स्पष्टता से बचते हुए कहा कि पार्टी तय करेगी।