शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:03 IST

नवीन मुख्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या हस्ते बुधवारी ‘९ए कोटला मार्ग' येथील सुसज्ज व अत्याधुनिक अशा ‘इंदिरा भवन' या काँग्रेस मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पूर्वी '२४, अकबर रोड'वर काँग्रेसचे मुख्यालय होते. तब्बल ४७ वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला आहे.

नवीन मुख्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे. मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नवीन अत्याधुनिक केंद्रीय मुख्यालयाला इंदिरा गांधी भवन असे नाव देण्यात आले असून, ते काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा दृष्टिकोन कायम ठेवण्यासाठी सतत केल्या जाणाऱ्या प्रयत्नाचे प्रतीक असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काळानुसार पुढे जाण्याची व नवीन गोष्टी आत्मसात करण्याची वेळ आली असल्याचे उद्घाटनप्रसंगी एआयसीसीचे संघटन सचिव वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. सोनिया काँग्रेसच्या अध्यक्ष असतानाच्या काळात या भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती.

नवीन मुख्यालयाची वैशिष्ट्ये या सहा मजली मुख्यालयाच्या सर्वात वरच्या मजल्यावर काँग्रेस अध्यक्षांचे कार्यालय असेल. मोठ्या बैठकांसाठी मिटिंग हॉल, पत्रकार परिषदेचे विशेष केंद्र, लाईव्ह प्रसारणाची सुविधा.अभ्यास व संशोधनासाठी भव्य ग्रंथालय, हायस्पीड इंटरनेट सेवा व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा. इमारतीत युवा, महिला काँग्रेस, एनएसयूआयसह काँग्रेसच्या विविध संघटनांची कार्यालये असतील. मुख्यालयाच्या विविध भागात काँग्रेसच्या इतिहासाची माहिती देणारी भित्तीपत्रक, तसेच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची छायाचित्रे असतील.२००९ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते या मुख्यालयाची पायाभरणी झाली होती. याच्या उभारणीसाठी २५२ कोटी रुपये खर्च आला आहे.  

- ४७ वर्षांनी नव्या इमारतीतून चालणार काम

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे