काँग्रेसची गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना नोटीस

By Admin | Updated: July 10, 2014 02:24 IST2014-07-10T02:24:08+5:302014-07-10T02:24:08+5:30

लोकसभा निवडणुकीच्यावेळी उत्तर गोवा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी घेतल्यानंतर गांभिर्याने कामच केले नाही,

Congress notice to former Chief Minister of Goa | काँग्रेसची गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना नोटीस

काँग्रेसची गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना नोटीस

 पणजी : लोकसभा निवडणुकीच्यावेळी उत्तर गोवा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी घेतल्यानंतर गांभिर्याने कामच केले नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर गोवा प्रदेश काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना नोटीस बजावली आहे. 

आठ दिवसांत त्यांना नोटिसीला उत्तर द्यायचे आहे. उमेदवारालाच नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागण्याची काँग्रेसमधील ही पहिली घटना आहे. जॉन फर्नाडिस यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून पक्षात शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रवी नाईक यांचा लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी एक लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला. निवडणुकीत रवी नाईक आणि काँग्रेस पक्ष संघटनेत समन्वय नव्हता. पक्षाने दिलेला निधी नाईक यांनी कशा प्रकारे खर्च केला याचीही प्रदेश काँग्रेस समितीला कल्पना नाही, अशी तक्रारी  केल्याचे बोलले जाते. काँग्रेसने गोवा प्रदेश युवक काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वालंका आलेमाव, माजी मंत्री व चर्चिल आलेमाव यांचे बंधू ज्योकिम आलेमाव आणि माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनाही नोटीस बजावली आहे. त्यांनाही आठ दिवसांची मुदत दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी पक्षविरोधी कारवाया केल्याची वालंका, ज्योकिम व सार्दिन यांच्याविरुद्ध तक्रार आहे.

Web Title: Congress notice to former Chief Minister of Goa