शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump Visit: ट्रम्प यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनात काँग्रेस सहभागी नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:50 IST

काँग्रेस हा संदेशही देऊ इच्छितो की, विदेशी पाहुण्याच्या सन्मानार्थ दिलेल्या भोजन समारंभावर काँग्रेसचा बहिष्कार आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ मंगळवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या भोजनास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आमंत्रित न केल्यावरून काँग्रेस एवढा नाराज आहे की त्याला हे ठरवता येत नाही की या भोजनात सहभाग घ्यावा की नाही?काँग्रेस हा संदेशही देऊ इच्छितो की, विदेशी पाहुण्याच्या सन्मानार्थ दिलेल्या भोजन समारंभावर काँग्रेसचा बहिष्कार आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, भोजन समारंभात भाग घ्यायचा नाही, असे आम्ही ठरवले आहे. कारण आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना सरकारने या समारंभाचे निमंत्रण पाठवलेले नाही.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना निमंत्रण दिले गेले आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार हे दोघे नेते भोजनात सहभागी व्हायला तयार आहेत म्हणजे हा संदेश देऊ शकतील की, काँग्रेसचा हेतू भोजन समारंभावर बहिष्कार घालण्याचा नाही. परंतु, पक्षाने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हे दोघेही नेते संभ्रमात आहेत की, त्यांनी भोजनात आम्ही सहभागी आहोत अशी स्वीकृती सरकारला पाठवावी की नाही.सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस अध्यक्ष वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर हे अंतिम रुपात हे स्पष्ट होईल की डॉ. मनमोहन सिंग आणि गुलाम नबी आझाद भोजनात सहभागी होतील की नाही. सरकारने मर्यादित संख्येतच विरोधी पक्ष नेत्यांना या भोजनासाठी बोलावले आहे.परंतु, उद्योग जगत आणि प्रसारमाध्यमातील अनेक ख्यातकीर्त लोकांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून स्वीकृतीही राष्ट्रपती भवनला मिळालेली आहे. ज्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले गेले आहे त्यात तेलंगणचे के. चंद्रशेखर राव यांच्यासह भाजपच्या काही मुख्यमंत्र्यांचाही सहभाग आहे.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी