खातेधारकांच्या यादीमुळे काँग्रेसची नाचक्की नाही - चिदंबरम
By Admin | Updated: October 24, 2014 16:43 IST2014-10-24T16:43:11+5:302014-10-24T16:43:11+5:30
काळा पैसा दडवणा-यांची यादी जाहीर झाल्यास काँग्रेसची नाचक्की होणार नाही. यादीत नाव आलेल्या नेत्याचा हा वैयक्तिक गुन्हा ठरेल व याचा संबंध पक्षाशी जोडता येणार नाही असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

खातेधारकांच्या यादीमुळे काँग्रेसची नाचक्की नाही - चिदंबरम
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - परदेशात काळा पैसा दडवणा-यांची यादी जाहीर झाल्यास काँग्रेसची नाचक्की होणार नाही. यादीत नाव आलेल्या नेत्याचा हा वैयक्तिक गुन्हा ठरेल व याचा संबंध पक्षाशी जोडता येणार नाही असे सांगत पी. चिदंबरम यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. अरुण जेटलींचे विधान ब्लॅकमेल करणारे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
काळा पैसा दडवणा-या खातेधारकांची नावे जाहीर केल्यास काँग्रेसची नाचक्की होईल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. जेटलींच्या या विधानावर शुक्रवारी पी. चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिले. अर्थमंत्री ब्लॅकमनीवरुन ब्लॅकमेलिंगकडे वळले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांनी आधी नावं जाहीर करावीत असा टोला चिदंबरम यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची गरज असून भविष्यात गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कुटुंबातील व्यक्तीही काँग्रेस अध्यक्ष पदावर विराजमान होऊ शकते असे मतही चिदंबरम यांनी मुलाखतीमध्ये माडंले आहे.