शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेस-राष्ट्रवादीचं मिशन 20-ट्वेंटी, प्रकाश आंबेडकरांची होणार एन्ट्री"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 14:18 IST

युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं आहे.प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 8 जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं जवळपास निश्चित केलं आहे.चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्यास तयारी दाखवली आहे.

मुंबईः महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 8 जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं जवळपास निश्चित केलं आहे. त्यातील चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्यास तयारी दाखवली आहे.2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास त्यांच्या 6 जागा निवडून येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. परंतु भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 20 जागांची मागणी केली आहे. 2014 मध्ये 26:22 असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारच न मिळाल्याने ती जागा अखेर काँगेसने लढवली होती. म्हणजेच गेल्या निवडणुकांत काँगेस 27 तर राष्ट्रवादी 21 जागांवर लढली होती. रायगड आणि हिंगोलीच्या जागांची तेव्हा अदलाबदल करण्यात आली होती. महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सामाजिक इतिहास हा गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, दलित, बहुजन, मुस्लिम, धनगर समाजांची मोट बांधून सत्तेच्या टापूला धक्का देणारा आहे. हा वंचित समाज निर्णायक ठरू शकतो, याची पुरेपूर कल्पना अ‍ॅड. आंबेडकर यांना आहे.तर कालच प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ, असंही जाहीर केलं होतं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेसकडे चांगला चेहराच नाही. मुंबई, ठाणे आणि पुण्यात काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही नाहीत. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही, अशी टीकाही काँग्रेसवर केली होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झाल्याची टीकाही त्यांनी केली होती. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९