शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:16 IST

Winter Session of Parliament: रेणुका चौधरी यांनी त्यांच्या पाळीव श्वानाला संसद भवनात नेल्याने नवा वाद निर्माण झाला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी त्यांच्या पाळीव श्वानाला गाडीत घेऊन संसद भवनात पोहोचल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि रेणुका चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

काँग्रेस खासदार रेणुका चौधरी त्यांच्या पाळीव श्वानासह संसदेच्या आवारात आल्याने वाद निर्माण झाला. भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी या घटनेला विशेषाधिकाराचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, "काँग्रेस खासदाराचे हे कृत्य लोकशाहीचा अपमान आणि संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. संसद ही राष्ट्रीय धोरणांवर चर्चा करण्यासाठी आहे. हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे सभागृह आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना कदाचित हे माहित नसेल की लोकसभा आणि राज्यसभा देशाच्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस खासदाराने त्यांच्या श्वानाला संसदेत आणणे आणि नंतर प्रश्न विचारल्यावर स्पष्टीकरण देणे हे देशाला लाजिरवाणे कृत्य आहे."

रेणुका चौधरी यांची प्रतिक्रिया

काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, एखादा मुका प्राणी आत आला तर काय अडचण आहे? तो चावणार नाही. चावणारे अनेकजण संसदेत बसले आहेत. श्वानासाठी पास उपलब्ध असेल तर तो बनवा, असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींवर टीका

सरकारने एक महिन्याचे अधिवेशन पंधरा दिवसांपर्यंत कमी केल्याने रेणुका चौधरी भडकल्या. "आम्ही सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करू, याची तुम्हाला भिती का वाटते? तुम्ही एक महिन्याचे अधिवेशन पंधरा दिवसांपर्यंत का कमी केले? कमी मुद्दे होते का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Renuka Chaudhary brings dog to Parliament, BJP protests erupts.

Web Summary : Congress MP Renuka Chaudhary's dog in Parliament sparks controversy. BJP demands action, alleging disrespect. Chaudhary defends, questioning shortened session, while Modi faces criticism.
टॅग्स :Politicsराजकारणdelhiदिल्ली