शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"लैगिंक छळाचे आरोप असलेला खासदार पंतप्रधानांच्या 'सुरक्षा कवच'मध्ये", राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 16:48 IST

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी २३ एप्रिलपासून देशातील नामांकित पैलवान आंदोलन करत आहेत. एक महिना उलटून गेल्यानंतरही सरकारकडून काही ठोस आश्वासन अथवा आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी रविवारी नवीन संसद भवनासमोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला पण दिल्ली पोलिसांनी धरपकड करून आंदोलन दडपले. पैलवानांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्ष सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. २५ आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणणाऱ्या मुली रस्त्यावर उतरून न्यायासाठी याचना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "२५ आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणणाऱ्या मुली रस्त्यावर उतरून न्यायासाठी याचना करत आहेत. २ एफआयआरमध्ये लैंगिक छळाचे १५ गंभीर आरोप असलेले खासदार - पंतप्रधानांच्या 'सुरक्षा कवच'मध्ये सुरक्षित. मुलींच्या या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

आखाड्याबाहेरील कुस्ती २३ एप्रिलपासून सुरू असलेली आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला. 

पैलवानांवर गुन्हे दाखल रविवारी एकिकडे नवीन संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं, तर दुसरीकडे या नव्या वास्तूसमोर आंदोलन करू पाहणाऱ्या पैलवानांची दिल्ली पोलिसांनी धरपकड केली. पैलवानांचे आंदोलन दडपल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. खरं तर पैलवानांवर दिल्ली पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीWrestlingकुस्तीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसsexual harassmentलैंगिक छळ