शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 11:13 IST

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते.

नवी दिल्ली - काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामीक अजेंडा काम करत असल्याचे म्हणत, त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जम्मू-काश्मिरात मुस्लिमेतरांच्या हत्या, काश्मीरमध्ये सैनिकांचे बलिदान आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, या सर्व घटनांचा संबंध एकमेकांशी जोडत, त्यांनी हे ट्विट केले आहे. (A larger pan Islamist agenda at work in South Asia - Manish Tewari)

तिवारी म्हणाले, काश्मीरमध्ये बिगर मुस्लिमांची हत्या, बांगलादेशात हिंदूंची हत्या आणि पुंछमध्ये 9 जवानांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का? कदाचित असे आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामिक अजेंडा काम करत आहे.

कश्मिरात आठवड्याभरात 9 जवानांना हौतात्म्य -जम्मू-काश्मिरात अँटी-टेरर ऑपरेशनमध्ये (Anti Terror Operation) 9 जवान शहीद झाले आहेत. गेल्या सोमवारपासून आतापर्यंत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 9 जवानांना हौतात्म्य आले आहे. गेल्या आठवड्यात पुंछमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या एका चकमकीत 5 जवानांना हौतात्म्य आले. यानंतर, 14 ऑक्टोबरला आणखी एका चकमकीत दोन जवानांना हौतात्म्य आले होते.

काश्मिरात मुस्लिमेतरांवरांवर हल्ले -कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते. या दहशतवाद्यांनी केवळ 5 दिवसांतच 7 सामान्य नागरिकांची हत्या केली. तेव्हापासूनच सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधत ऑपरेशन सुरू केले आहे. 

बांगलादेशातही धार्मिक हिंसाचार -बांगलादेशातही  हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांना निशाना बनवण्यात येत आहे. एका अफवेनंतर तेथे सर्वप्रथम एका दुर्गापुजा पेंडॉलवर हल्ला करण्यात आला आणि हिंदू देवतेच्या मूर्ती तोडण्यात आल्या. तेथे अनेक जिल्ह्यांत तणावाची परिस्थिती आहे. तेथील नवाखली येथे शुक्रवारी नमाननंतर जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला होता. यावेळी श्रद्धाळूंना मारहाणही करण्यात आली. या हल्ल्यात एकाचा मृत्यूही झाला होता. आतापर्यंत, येथील धार्मिक हिंसाचारात मरणारांची संख्या 6 वर पोहोचली आहे. 200 हून अधिक हिंदू श्रद्धाळू जख्मी झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -- बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू

टॅग्स :congressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरBangladeshबांगलादेशterroristदहशतवादीIslamइस्लामMuslimमुस्लीम