शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यात कमळ कोमेजण्याची शक्यता; सत्ता जाणार काँग्रेसच्या 'हाता'त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 08:01 IST

विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील

इम्फाळ : चार मंत्र्यांसह भाजपप्रणीत आघाडीच्या नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर मणिपुरात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून, काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस लवकरच एन. बिरेन सिंह सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणणार आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ओ. इबोबी सिंह यांनी सांगितले.विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या चार मंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे इबोबी सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आम्हाला आणि आमच्या पक्षाला योग्य वागणूक न दिल्याने सरकारचा राजीनामा दिल्याचे चार मंत्र्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी सांगितले की, राज्य सरकारविरुद्ध काँग्रेस अविश्वास ठराव आणणार असून, विधानसभेचे विशेष अधिवेशन लवकर बोलाविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष युमनाम खेमचंद सिंह यांची मी भेट घेणार आहे. दरम्यान, काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष वाय. खेमचंद यांंना हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.सापत्न वागणुकीमुळे मी अािण एनपीपीच्या तीन सहकाऱ्यांनी मणिपूरमधील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिला, असे माजी उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार यांनी सांगितले. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही हा पर्याय पडताळून पाहणार असून, अविश्वास ठराव मांडल्यानंतर आम्ही निश्चितच सरकार स्थापन करू.१९ जून रोजी मणिपूरमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार असताना या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप आणि काँग्रेसने राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवार दिले आहेत.विधानसभेत असे आहे संख्याबळउपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह, आदिवासी आणि पर्वतीय क्षेत्र विकासमंत्री एन. कायिशी, युवक कल्याणमंत्री लेतपाओ हाओकीप आणि आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री एल. जयंत कुमार सिंह यांनी बुधवारी मंत्रीपदाचे राजीनामा दिले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने आणि एका अपक्ष आमदारानेही सरकारचा पाठिंबा काढला आहे.विरोधकांचे संख्याबळ २९२० काँग्रेस, ४ एनपीपी, ३ भाजप आणि तृणमूल काँग्रेस आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे.बिरेन सिंह यांच्या मागे २३१८ भाजप , ४ एनपीएफ, एक लोजपा जणांचे पाठबळ आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा