शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदाराचे जय श्री राम, मंदिर उभारणीसाठी 51 लाखांचं योग'दान'

By महेश गलांडे | Updated: February 10, 2021 13:17 IST

माझे सर्व सहकारी आणि टीममधील सदस्यांच्या वतीने मी ही देणगी विश्व हिंदू परिषदेला (VHP) देत आहे. यासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे,’’ असे अदिती यांनी म्हटले.

ठळक मुद्दे माझे सर्व सहकारी आणि टीममधील सदस्यांच्या वतीने मी ही देणगी विश्व हिंदू परिषदेला (VHP) देत आहे. यासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे,’’ असे अदिती यांनी म्हटले.

रायबरेली - पंतप्रधान नरेद्र मोदींनी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर आता जगभरातून या भव्य दिव्य मंदिरासाठी देगणी जमा करण्यात येत आहे. अयोध्येतील या मंदिरासाठी केवळ भाजपाच नाही, तर अनेक पक्षांचे नेते स्वशुखीने देणगी देत आहेत. आता, बंडखोर काँग्रेस नेत्या आणि आमदार अदिती सिंह (Rebel Congress MLA Aditi Singh) यांनी अयोध्येतील ( Ayodhya)  राम मंदिरासाठी (Ram Temple) देणगी दिली आहे. राम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टचे सचिव चंपत राय यांना आपल्या समर्थकांकडून गोळा केलेला 51 लाख रुपयांचा चेक सोपवला आहे. याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी माहिती दिली.

माझे सर्व सहकारी आणि टीममधील सदस्यांच्या वतीने मी ही देणगी विश्व हिंदू परिषदेला (VHP) देत आहे. यासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे,’’ असे अदिती यांनी म्हटले. “आपले वडील आज असते तर त्यांना हा कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला असता. पक्षाचा विचार न करता या कार्यक्रमाचं पावित्र्य सर्वांनी जपलं पाहिजे ’’, असं आवाहनही त्यांनी केलं. अदिती सिंह या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मतदरासंघातील आमदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांच्यावर जिल्ह्यातील नागरिकांना न भेटल्याबद्दलह त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.  अयोध्येतील राम मंदिरासाठी संघ परिवाराच्या वतीने मकर संक्रातीपासून देशव्यापी निधी संकलन अभियान राबवले जात आहे. माघ पौर्णिमा म्हणजेच 27 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 600 कोटींपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. राम मंदिर उभारणीला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून विदेशातूनही भारतीय नागरिक निधी देत आहेत. 

प्रभू श्रीराम सर्वांचेच

"प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचं आहे. जर तुम्ही कोणती चूक केली तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याcongressकाँग्रेसMLAआमदार