शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

आणीबाणी देश वाचवण्यासाठी नाही, तर..; नेहरू, इंदिरांचा उल्लेख करत नड्डांचा काँग्रेसवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:54 IST

'काँग्रेसने कलम 356 चा गैरवापर करून संपूर्ण रचनाच बिघडवली. काँग्रेसच्या काळात एकूण 90 वेळा याचा गैरवापर झाला.'

One Nation One Election : मागील अनेक महिन्यांपासून ज्या विधेयकाची चर्चा सुरू होती, ते 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आज(दि.17) अखेर लोकसभेत सादर करण्यात आले. पण, या विधेयकाला काँग्रेस, टीएमसी आणि सपासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, या सर्व गदारोळात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना नड्डा म्हणाले की, मागील काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. कलम 356 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित असून. दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान नड्डांनी काँग्रेसवर राज्यघटनेची मूलभूत तत्वे बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

काँग्रेसने निवडून आलेली सरकारे पाडली

नड्डा पुढे म्हणाले की, आज तुम्ही एक देश, एक निवडणुकीच्या विरोधात उभे आहात. पण, तुमच्यामुळेच एक देश, एक निवडणूक आणायची आहे. कारण 1952 ते 1967, या काळात देशात एकाच वेळी निवडणुका झाल्या. कलम 356 चा वापर करून तुम्ही (काँग्रेस) वारंवार राज्यांतील निवडून आलेली सरकारे पाडलीत आणि अनेक राज्यांत स्वतंत्र निवडणुकांची परिस्थिती निर्माण केली.

इंदिराजींनी 50 वेळा तर मनमोहन यांनी 10 वेळा...कलम 356 चे आकडे सभागृहात मांडताना जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेस सरकारने 90 वेळा कलम 356 चा गैरवापर केला आहे. इंदिरा गांधींनी कलम 356 चा सर्वाधिक 50 वेळा वापर केला. तर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा आठ वेळा, राजीव गांधींनी नऊ वेळा आणि मनमोहन सिंग यांनी दहा वेळा गैरवापर केला आहे, अशी घणाघाती टीकाही नड्डांनी यावेळी केली.

मनमोहन, गुजराल, अडवाणींचा उल्लेख पश्चिम पाकिस्तानातून आलेले मनमोहन सिंग, इंदर कुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले, पश्चिम पाकिस्तानातून आलेले लालकृष्ण अडवाणी भारताचे उपपंतप्रधान झाले. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पीओकेतून जम्मू-काश्मीरमध्ये आलेला एकही व्यक्ती जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा सदस्य होऊ शकत नव्हता, त्यांना पंचायत निवडणूक लढवता येत नव्हता, त्या व्यक्तीला मतदानही करण्याचा अधिकार नव्हता. नरेंद्र मोदींच्या सरकारने त्यात सुधारणा केली आणि आज जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आणीबाणीवरुन नड्डांची टीका

आणीबाणीचा उल्लेख करत नड्डा म्हणाले, देशावर काही संकट आले होते का, की देशावर आणीबाणी थोपवली गेली. नाही... देशाला कसलाही धोका नव्हता, खुर्चीला धोका होता. किस्सा खुर्चीचा होता. जिच्यासाठी संपूर्ण देशाला अंधकारात ढकलण्यात आले. काँग्रेसचे सदस्य म्हणतात की, त्यांच्या नेत्याने आणीबाणीची चूक मान्य केली आहे, त्यामुळे याचा वारंवार उल्लेख केला जाऊ नये. पण, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. आपल्या मनात जर प्रायश्चित्ताची जराही भावना असेल, तर मी आवाहन करतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनJ P Naddaजगत प्रकाश नड्डाcongressकाँग्रेसBJPभाजपा