शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मेघालयात काँग्रेस बनला नं. 1... सत्ताधारी पक्षालाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 19:24 IST

या पोटनिवडणुकीतील विजयामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

शिलाँग- मेघालयातल्या अंपाती जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार मोमिन यांचा 3191 मतांनी पराभव केला आहे. एकीकडे या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीतील विजयामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.मियानी डी शिरा या काँग्रेस पक्षाकडून अंपाती जागेवर पोटनिवडणूक लढवत होती. मियानीच्या आधी या जागेवर मेघालयाचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमांनी निवडणूक जिंकली होती. परंतु त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानं या जागेवर पोटनिवडणूक लागली होती.  28 मे रोजी या जागेवर मतदान घेण्यात आले असून, त्यावेळी जवळपास 90टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज जाहीर झालेल्या निकालावरून मियानी डी शिरानं स्वतःच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार मोमिनचा 3191 मतांनी पराभव केला होता. काँग्रेस बनला राज्य विधानसभेत सर्वात मोठा पक्षगुरुवारी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस हा मेघालय राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 21 जागांवर विजय मिळाला होता. तर नॅशनल पीपल्स पार्टीनं 19 जागा जिंकल्या आहेत. त्या निवडणुकीत मुकुल संगमा दोन जागांवरून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांनी एका जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसजवळ 20 जागा शिल्लक राहिल्या. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा विजयी झाल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ पुन्हा 21 झालं आहे. नॅशनल पीपल्स पार्टीला विलियमनगर विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्याची संख्या 20 पर्यंत पोहोचली आहे. 

टॅग्स :Meghalaya Election Results 2018मेघालय निवडणूक निकाल 2018