शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:31 IST

Congress Meeting : आज काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सर्व सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली.

Congress Meeting : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता काँग्रेसने (Congress) आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर आज(दि.13) राजधानी दिल्लीत पक्ष मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी आणि राज्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

कोणत्या विषयावर चर्चा झाली?मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत संघटना मजबूत करणे, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, जात जनगणनेची मागणी आणि एससी-एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांची मते, सूचना आणि पक्षाची राज्यांतील परिस्थितीबाबत प्रतिक्रिया घेतल्या.या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसची ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात झाला : खरगेया बैठकीनंतर काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर बेरोजगारी, महागाई आणि संविधानाच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला. देशातील गरीब आणि मध्यमवर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सेबी आणि अदानी यांच्यातील संबंधाचे धक्कादायक खुलासे झाले आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची गरज आहे. छोट्या गुंतवणूकदारांचा पैसा शेअर बाजारात धोक्यात घालता येत नाही. मोदी सरकारने तात्काळ सेबी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करावी आणि या संदर्भात JPC (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करावी.

जात जनगणनेची लोकांची मागणीते पुढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आपला लढा सुरूच ठेवणार आहे. देशातील तरुणांवर लादलेली अग्निपथ योजना सरकारने रद्द करावी. रेल्वे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, गाड्या रुळावरून घसरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. हवामान-संबंधित आपत्ती आणि ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा ही देखील चिंतेची कारणे आहेत. या प्रश्नांवर राष्ट्रीय मोहीम तयार करून लोकांपर्यंत जाणार असल्याचे खरगे यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी