शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

काँग्रेसचे उदयपूरमध्ये चिंतन शिबिर; देशभरातून ४०० हून अधिक प्रमुख नेते उपस्थित राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 6:47 AM

चिंतन शिबिराच्या निमित्ताने स्वागतासाठी येथे पोस्टर लागले आहेत. या पोस्टरवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रसचे नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे छायाचित्र आहे.

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्क उदयपूर : राजस्थानात उदयपूर येथे शुक्रवारपासून काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर होत आहे. पक्षाचे ४०० हून अधिक नेते यात उपस्थित राहतील. ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी मार्ग शोधणे व आगामी निवडणुकांसाठी रणनीतीवर या वेळी चर्चा होईल. शिबिराची सुरुवात १३ मे रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संबोधनाने होईल. त्यानंतर सहा वेगवेगळ्या समूहांत नेते चर्चा करतील. १५ मे रोजी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करतील.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मुक्त अर्थव्यवस्था, संपत्तीची वाढीत असमानता, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ आदी विषयांवर विचार केला जाईल. चीनकडून भारताच्या अखंडतेवर हल्ला होत आहे. दलित, एससी, एसटी, अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर हल्ला होत आहे. दोन समुदायांना विभाजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुरजेवाला म्हणाले की, धर्मांधतेचा बुलडोझर, अंधश्रद्धा, धर्मांधता, अन्याय आणि असहिष्णुता हे देशावर लादले गेले आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाला अडथळे येत आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसने सहा विषयांची निवड केली आहे. त्यावर कार्यवाहीसाठी समूहांची नियुक्ती केली आहे. या समूहात राजकीय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, पक्षाचे संघटन, शेतकरी आणि शेतमजूर आणि युवा यांचा समावेश आहे. चिंतन शिबिरासाठी येणाऱ्या ४३० लोकांना विविध समूहात विभाजित करण्यात येईल. या तीन दिवसांत विविध विषयांवर मंथन होईल. याचा निष्कर्ष काँग्रेस अध्यक्षांकडे मांडला जाईल. त्याला अंतिम स्वरुप आणि मंजुरी देण्यासाठी कार्यसमितीकडे पाठविण्यात येईल.

शहरात लागले पोस्टर चिंतन शिबिराच्या निमित्ताने स्वागतासाठी येथे पोस्टर लागले आहेत. या पोस्टरवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रसचे नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे छायाचित्र आहे. शहरात ठिकठिकाणी हे पोस्टर दिसत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस