‘जीएसटी’वर काँग्रेस दर्शवणार असहमती
By Admin | Updated: July 18, 2015 03:03 IST2015-07-18T03:03:59+5:302015-07-18T03:03:59+5:30
बहुचर्चित वस्तू व सेवा कर(जीएसटी) मुद्यावर केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यातील मतभेद मावळण्याची कुठलीही चिन्हे नसताना जीएसटी विधेयकावरील

‘जीएसटी’वर काँग्रेस दर्शवणार असहमती
नवी दिल्ली : बहुचर्चित वस्तू व सेवा कर(जीएसटी) मुद्यावर केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यातील मतभेद मावळण्याची कुठलीही चिन्हे नसताना जीएसटी विधेयकावरील संसदीय समितीच्या अहवालात अंतर्भूत करण्याच्या इराद्याने काँग्रेस असहमती पत्र देणार आहे. त्या दिशेने काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे.
जीएसटी विधेयकावरील संसदीय समिती आपल्या अहवालास येत्या सोमवारी अंतिम रूप देणार आहे. पुढील आठवड्यात हा अहवाल राज्यसभेत मांडला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीस २४ जुलैपर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)