शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 15:47 IST

Kargil Vijay Diwas: पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge on Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. लडाखमधील १९९९ च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, जम्मू-काश्मीर, लडाख, अग्निपथ योजना आणि विरोध यावर भाष्य केले. कारगिलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अग्निवीर योजनेबाबत भाष्य केल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. कारगिल येथे केलेल्या भाषणावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान कारगिल विजय दिनानिमित्तही तोच खोटेपणा पसरवत असून क्षुद्र राजकारण करत आहेत, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अग्निवीर योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला.

"लष्करातील सुधारणांना आमचे पहिले प्राधान्य आहे. अग्निपथ योजना हा त्याचाच एक भाग आहे. अनेक दशकांपासून लष्कराला तरुण बनविण्यावर संसदेत चर्चा होत होती. अनेक समित्यांमध्ये हा विषय मांडण्यात आला, मात्र हा बदल करण्याची इच्छाशक्ती यापूर्वी दाखवली गेली नाही. पण सत्य हे आहे की अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशातील कर्तबगार तरुणही मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येतील. पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचा भ्रम विरोधक पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचारांची मला लाज वाटते," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या टीकेनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खरगे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर याबाबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

"आजवर कोणत्याही पंतप्रधानाने असे केले नाही. पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की त्यांच्या सरकारने अग्निपथ योजना लष्कराच्या सांगण्यावरून राबवली  हे पूर्णपणे खोटे आहे. याशिवाय हे आपल्या लष्करी दलांचाही अपमान करणारे आहे. माजी लष्करप्रमुख निवृत्त जनरल एमएम नरवणे यांनी रेकॉर्डवर म्हटले आहे की अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेले ७५ टक्के तरुण कायमस्वरूपी होतील. तर २५ टक्के चार वर्षांनंतर काढले जातील. पण मोदी सरकार नेमके उलटे करत आहे," असं खरगे म्हणाले.

"मोदी सरकारने तिन्ही सैन्य दलांसाठी अग्निपथ योजना सक्तीने लागू केली. एमएम नरवणे यांनी याबाबत एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अग्निपथ योजना लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. पण मोदी सरकार हे पुस्तक प्रकाशित करू देत नाहीये. केवळ सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन आपण व्यावसायिक सैनिक तयार करत आहोत का? सैनिक पैसे कमावण्यासाठी नव्हे तर देशभक्तीसाठी सैन्यात भरती होतात," असेही खरगे म्हणाले. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस