शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

काँग्रेसने अनेक जागांचा मोह सोडला; ७० जागा दिल्या मित्रपक्षांना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 09:04 IST

‘इंडिया’चा पुढील मार्ग होतोय सोपा; अनेक ठिकाणी भाजपसमोर एकच तगडा उमेदवार; अंतर्गत नाराजी दूर करणार

नवी दिल्ली : इंडिया आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा निर्णय वेगाने घेतला जात आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लढवलेल्या जागांचे ‘बलिदान’ हे बऱ्याच अंशी त्याचे कारण आहे. यावरून काँग्रेसमध्ये काहीशी अंतर्गत नाराजी आहे, पण भाजपविरोधात लढण्यासाठी पक्षाकडे दुसरा पर्यायही नाही.

  काँग्रेसने अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा मोह सोडला तरच ही आघाडी यशस्वी होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. काँग्रेसने २०१९ मध्ये लढलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यास सुरुवात करताच जागावाटप सोपे झाले आहे.

महाराष्ट्रात काय? - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८पैकी २५ जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. - यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि प्रकाशआंबेडकर यांच्या पक्षाशी युती झाल्यामुळे काँग्रेसला२५ जागा मिळणे कठीण आहे. - येथेही काँग्रेसला काही जागा सोडाव्या लागतील. 

नेत्यांची समजूत काढावी लागणारकाँग्रेसने आपल्या जागा सोडण्याची तयारी दर्शविली असली तरीही तेथे लढाईच्या तयारीत असलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे. काही नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

कुठे होईल फायदा? तामिळनाडू आणि बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला मित्रपक्षांपेक्षा एक ते दोन जास्त जागा मिळू शकतात. त्यामुळे तेथे फायदा होण्याची शक्यता आहे.

मित्रपक्षांना फायदाकाँग्रेसने २०१९ मध्ये ४२१ जागा लढवल्या, त्यापैकी फक्त ५२ जागा जिंकल्या होत्या. यामुळे भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसला मतांचे विभाजन रोखण्याची रणनीती अवलंबावी लागली आहे.त्यामुळेच काँग्रेसने पक्षांशी  आघाडी केली. काँग्रेसने मित्रपक्षांसह ६ राज्यांत १२६ जागांचे वाटप करत एकच उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे.यात काँग्रेसने मित्रपक्षांसाठी ७० जागांचे ‘बलिदान’ दिले आहे. बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडमधील १४० जागांसाठी एकच उमेदवार देण्यावरही लवकरच निर्णय होणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी