शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:34 IST

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ५२ जागांपर्यंत मजल मारली असली तरी २०१४ च्या १९ जागा पक्षाला गमवाव्या लागल्यात.

- असिफ कुरणे नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ५२ जागांपर्यंत मजल मारली असली तरी २०१४ च्या १९ जागा पक्षाला गमवाव्या लागल्यात. नव्याने २५ जागा काँग्रेसने जिंकून घेतल्या आहेत. २०१४ च्या लाटेत जिंकलेल्या जागा राखण्यात यश आले असते तर काँग्रेसच्या जागा ७० वर पोहोचल्या असत्या.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्त मोदी लाट होती. त्याचा फटका काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बसला. काँग्रेसचे काही बालेकिल्ले गमवावे लागले. महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली या जागा काँग्रेसने गमावल्या. तर चंद्रपूरची जागा नव्याने जिंकली. तेलंगणामध्ये भोगीर ही जागा नव्याने पटकावली. त्याचप्रमाणे पुड्डेचेरी आणि अंदमान निकोबार येथील जागा परत मिळविण्यात काँग्रेसला यश आले. छत्तीसगडमध्ये कोरबा जागा नव्याने मिळविली. ओडिसामध्ये कोरापेट या जागेवरून सप्तगिरी उल्का विजयी झाले. कोस्मे फ्रान्सिस्को यांनी दक्षिण गोव्याची जागा भाजपकडून परत खेचून आणली. काँग्रेसला यावेळी मोलाची साथ दिली ती दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू तर उत्तरेतील पंजाब राज्याने. केरळमध्ये गेल्यावेळी ८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी १५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. पंजाबमधील ३ जागांवरून ८ जागांवर मजल गेली. तमिळनाडूमध्ये द्रमुकसोबत झालेल्या आघाडीचा फायदा काँग्रेस उमेदवारांना झाला. गेल्यावेळी एकही जागा नसणाऱ्या तमिळनाडूमध्ये यावेळी ८ जागांची लॉटरी लागली आहे. काही राज्यांत चांगली कामगिरी झाली असली तरी उत्तरेतील तीन राज्यांत सत्ता येऊनदेखील काँग्रेसला लोकसभेला पदरात काही पडले नाही. राजस्थान, गुजरातमध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील जागा दोनची एक झाली. येथे छिंदवाडाची जागा राखण्यात पक्षाला यश आले. तर गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. सर्वांत मोठा फटका कर्नाटकात बसला असून, येथे जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) सोबत सत्ता आहे. तरी पक्षाला आठ जागा गमवाव्या लागल्या. बंगलोरमधील एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला. बिहारमधील तारीक अन्वर यांची जागा पक्षाला गमवावी लागली. ईशान्येकडील राज्यातील चार जागा हातातून निसटल्या.>उत्तर प्रदेशातील पारंपरिक बालेकिल्ला असणाºया अमेठीमधून राहुल गांधी यांना, तर हरियाणातील रोहतकमधून दिपेंदर हुड्डा यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१४ च्या पारंपरिक जागा हरल्यामुळे काँग्रेसला १९ जागांचा फटका बसला. या जागा जिंकण्याची शक्यता जास्त असताना पराभव स्वीकारावा लागला.

टॅग्स :congressकाँग्रेस