शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांचे देशात दौरे; पी. चिदंबरम येणार पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:42 IST

केंद्र सरकारने घेतलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा, नागरिकत्व नोंदणी कायदा दुरूस्ती या तसेच कामगार हित विरोधी धोरणे व अन्य बदलांमुळे नागरिकांमधील असंतोष वाढतो.

ठळक मुद्देकेंद्रीय नेत्यांना देशाच्या विविध भागात जाऊन लोकजागरण करण्याचे आदेश येत्या ७ फेब्रुवारीला पुण्यात पी. चिंदबरम यांच्या व्याख्यानाचे आयोजनकेंद्रीय नेत्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पक्षाच्या स्थानिक शाखांना करावे मार्गदर्शन

पुणे : केंद्रातील भारतीय जनता पार्टीप्रणित सरकारच्या विरोधातील मुद्दे देशात सर्वत्र पोहचवण्यासाठी काँग्रेसने केंद्रीय नेत्यांना देशाच्या विविध भागात जाऊन मुद्द्यांवर आधारीत लोकजागरण करण्याचे आदेश दिले आहेत. माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्यापासून ते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश या पथकामध्ये आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा, नागरिकत्व नोंदणी कायदा दुरूस्ती या तसेच कामगार हित विरोधी धोरणे व अन्य बदलांमुळे नागरिकांमधील असंतोष वाढतो आहे, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते भरकटल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे आंदोलने होऊनही त्याचा राजकीय उपयोग होत नाही असा निष्कर्ष पक्षश्रेष्ठींनी केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ७ फेब्रुवारीला पुण्यात पी. चिंदबरम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले, की पक्षाच्या स्थानिक शाखा भाजपा विरोधातील मुद्दे प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. त्यामुळेच केंद्रीय नेत्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पक्षाच्या स्थानिक शाखांना मार्गदर्शन करावे, लहान सभा घ्याव्यात तसेच समाजातील विविध घटकांबरोबर संवाद साधावा, असे आदेश पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र पथक त्यांनी तयार केले असून पक्षाच्या केंद्रीय शाखेने त्यांच्या दौऱ्यांचा कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, अभिषेक मनू सिंघवी, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व मिडिया, कम्यनिकेशन कक्षाचे केंद्रीय प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला, गुलाम नबी आझाद, माजी व्यापार मंत्री आनंद शर्मा व अन्य काही केंद्रीय नेत्यांचा या पथकात समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमSonia Gandhiसोनिया गांधीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण