शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:59 IST

सुधारित नागरिकत्व कायद्यावर बोलताना स्वामींचं मोठं विधान

हैदराबाद: सध्या देशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (सीएए) कोणाचंही नागरिकत्व जाणार नाही. उलट यामुळे नागरिकत्व दिलं जाईल, असा मोदी सरकारचा दावा आहे. तर सीएए घटनाविरोधी असल्याचा प्रतिदावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभेतले खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं नागरिकत्व लवकरच जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. हैदराबाद विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य करताना सोनिया आणि राहुल गांधींचं नागरिकत्व लवकरच रद्द होणार असल्याचं सांगितलं. अमित शहांच्या टेबलवर एक फाईल आहे. त्यामुळे लवकरच त्या दोघांचंही नागरिकत्व जाईल, असं स्वामी म्हणाले. 'एखाद्या भारतीय व्यक्तीनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं. संविधानात तसं नमूद करण्यात आलेलं आहे,' असं स्वामी यांनी सांगितलं. राहुल गांधींना इंग्लंडमध्ये व्यवसाय सुरू करायचा असल्यानं ते लवकरच इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारणार असल्याचा दावा स्वामींनी केला. राहुल यांचे वडील (राजीव गांधी) भारतीय होते. त्यामुळे ते भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. मात्र सोनिया गांधी तसं करू शकत नाहीत, असं ते पुढे म्हणाले. सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी तो कायदा नीट समजूनच घेतलेला नाही. त्यांनी तो कायदा वाचलेलाच नाही, अशा शब्दांत स्वामींनी आंदोलकांलर टीका केली. सीएएविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतल्या शाहीन बागेत मुस्लिम महिला आंदोलन करत आहेत. त्यावर भाष्य करताना सीएएचा भारतीय मुस्लिमांवर कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीRajiv Gandhiराजीव गांधीAmit Shahअमित शहा