काँग्रेस नेत्यांनी घेतली मोदींची भेट
By Admin | Updated: March 18, 2015 23:47 IST2015-03-18T23:47:07+5:302015-03-18T23:47:07+5:30
मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळाप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी संसद भवनातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

काँग्रेस नेत्यांनी घेतली मोदींची भेट
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळाप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी संसद भवनातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा या घोटाळ्यातील सहभाग सिद्ध करणारे ठोस पुरावे त्यांना सादर केले.
या घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी आणि चौहान यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याची मागणीही काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांकडे केली. शिष्टमंडळात काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंग, कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ व विवेक तन्खा यांचा समावेश होता.