शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह नाही; बचावासाठी सरसावले काँग्रेस नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 14:17 IST

काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 2014 च्या निवडणुकीपेक्षाही मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 302 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला 350 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. अवघ्या 52 जागांवर काँग्रेस विजयी झालं आहे तर काही राज्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. 

काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना कमलनाथ यांनी सांगितले की, काँग्रेसला आपलं म्हणणं लोकांपर्यत पोहचविण्यासाठी पूर्णपणे यशस्वी ठरू शकली नाही. प्रियंका गांधी यांना सक्रीय राजकारणात आणण्यासोबत पक्षात जबाबदारी देण्यास उशीर झाला. प्रियंका गांधी यांना खूप आधी काँग्रेसच्या प्रचारात उतरवलं जाऊ शकत होतं. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा निवडणूक प्रचार जोरात होता. नरेंद्र मोदी यांचे म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं गेले मात्र काँग्रेसला अपेक्षितपणे तसं करता आलं नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत आणि राहतील असं कमलनाथ यांनी सांगितले. 

न्याय आणण्यास झाला उशीर काँग्रेसने न्याय योजना गरिब लोकांसाठी आणली मात्र ही आणण्यास काँग्रेसला उशीर झाला. आम्ही ही योजना प्रचारात पहिली आणू शकलो असतो पण त्याला उशीर झाला. भाजपाच्या प्रचारात ही योजना फक्त निवडणुकीचं आश्वासन म्हणून राहिली. 

भोपाळ लोकसभा मतदारसंघात दिग्विजय सिंह यांचा पराभव केवळ हिंदूत्ववादी मुद्द्यामुळे झाला. विभाजनाच्या वातावरणात लोकांनी इतर मुद्दे विसरून फक्त हिंदू म्हणून मतं दिली. महात्मा गांधी यांची विचारधारा हरली आणि गोडसे विचारधारा जिंकली हे चिंता करण्यासारखं आहे असं कमलनाथ यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी