शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:58 IST

४ दिवसांपूर्वी खासगी दौऱ्यावर सोनिया गांधी या फार्म हाऊसवर आल्या होत्या.

नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची शनिवारी तब्येत बिघडली. ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना तातडीने शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सोनिया गांधी रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलला आल्याचे तिथले ज्येष्ठ मेडिकल सुप्रीडेंट डॉ. राहुल राव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांच्या माध्यम सल्लागारांनी सांगितले की, सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणास्तव रूटीन तपासासासाठी हॉस्पिटलला आल्या होत्या. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती त्यांनी दिली. सोनिया गांधी २ जून रोजी शिमला येथे आल्या होत्या. इथल्या छराबडा येथील फार्म हाऊसवर त्या मुक्कामी होत्या. शिमलापासून १३ किमी अंतरावर छराबडा येथे हे फार्म हाऊस आहे. या फार्महाऊस समोरच बर्फाचे डोंगर आहेत. सोनिया गांधींसह राहुल आणि प्रियंका गांधी उन्हाळ्याच्या सुट्टीत याठिकाणी सुट्टी साजरी करण्यासाठी येतात. 

४ दिवसांपूर्वी खासगी दौऱ्यावर सोनिया गांधी या फार्म हाऊसवर आल्या होत्या. आज नियमित तपासणीसाठी त्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, शिमला येथे गेल्या. तिथे विशेष डॉक्टरांच्या एका टीमने त्यांच्या देखरेखीत काही चाचण्या केल्या. सोनिया गांधी यांना विशेष व्हिआयपी वार्डमध्ये दाखल केले आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांचे चेकअप करण्यात आले अशी बातमी समोर आली होती. हॉस्पिटल प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण परिसरात अलर्ट ठेवला होता. त्याशिवाय पोलिसांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. 

२०२४ मध्येही सोनिया गांधींची तब्येत बिघडली होती

मार्च २०२४ मध्ये सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याने दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केले होते. ७६ वर्षीय सोनिया गांधी यांना ताप आला होता. त्याआधी ५ जानेवारी २०२४ रोजीही व्हायरल इंफेक्शनमुळे त्यांना हॉस्पिटलला दाखल केले होते. १२ जून २०२२ मध्ये सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. १ जून रोजी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस