शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Income Tax New Portal : जेव्हा जुनंच चांगलं होतं, तर नव्या पोर्टलवर ४,२०० कोटींचा खर्च का?; थरूर यांचा केंद्राला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 17:54 IST

Income Tax New Portal : काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये करण्यात आले होते बदल. बदलांनंतर अनेकांना उद्भवत होत्या समस्या.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये करण्यात आले होते बदल. बदलांनंतर अनेकांना उद्भवत होत्या समस्या.

नवीन आयकर पोर्टलमधील तांत्रिक अडचणींवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ४,२०० कोटी रुपये खर्च करूनही सरकारला पोर्टल वापरकर्त्यांसाठी सोपं आणि अत्याधुनिक बनवता आलं नाही आणि समस्या निर्माण झाल्या असा आरोप शशी थरूर यांनी केला.

"यापूर्वीचं पोर्टल चांगलं चालत होतं तर या नव्या पोर्टलची गरज ताय होती?," असा सवाल थरूर यांनी सरकारला केला. काँग्रेसच्या अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसशी निगडीत काही चार्टर्ड अकाऊंटंट यांनी आयकर पोर्टलमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे समस्य़ा निर्माण झाल्याची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच लॉग इन करण्यासही सामान्य वेळापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचं सांगण्यात आल्याचं थरूर म्हणाले.  जून महिन्यात बदल का?नव्या पोर्टमुळे अनेक फीचर्स कोणत्या ना कोणत्या ठिकाणी अडकतात. तसंच यामुळे आयटीआर दाखल करण्यात तसंच १५ सीए आणि १५ सीबी फॉर्म भरण्यात, अपिलांची आकडेवारी तयार करण्यात समस्या येत असल्याचं थरूर यांनी नमूद केलं. "जून महिन्यात सरकारनं आयकर पोर्टलमध्ये बदल का केले हे स्पष्ट नाही. आर्थिक वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरूवातील यामध्ये बदल केला गेला असता तर आयकर रिफंडच्या करदात्यांना या कठीण काळात मदत मिळाली असती," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

नव्या पोर्टलची गरज काय?ज्यावेळी नवं पोर्टल योग्यरित्या सुरू होतं तर अशा परिस्थितीत नव्या पोर्टलची गरज काय होती? हा बदल अशावेळी करण्यात आला जेव्हा सामान्यत: करदाते आपला रिटर्न फाईल करतात किंवा रिफंडची मागणी करतात. हे सर्वासाठी उपलब्ध करून देण्यापूर्वी याची चाचणी का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला. "वापरकर्त्यांसाठी अधिक योग्य, अत्याधुनिक पोर्टल तयार करणं हा यामागील उद्देश होता. ४,२०० कोची रूपये खर्च करून सरकारला असं करता आलं आणि समस्या निर्माण केली," असंही थरूर म्हणाले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसGovernmentसरकारIndiaभारतIncome Taxइन्कम टॅक्स