शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

Narendra Modi: पंतप्रधानांना शोधायला बंगालमध्ये जायचं का?; लोकसभेत सवाल अन् तितक्यात सभागृहात पोहोचले मोदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 16:35 IST

Narendra Modi: नरेंद्र मोदी त्याचवेळी लोकसभेत पोहोचले आणि एक विरोधकांना जशास तसं उत्तर मिळालं. 

लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनोखा प्रकार पाहायला मिळाला. सभागृहाचं कामकाज संपण्यापूर्वी काँग्रेसचे नेता रवनीत सिंह यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. पण नरेंद्र मोदी त्याचवेळी लोकसभेत पोहोचले आणि एक विरोधकांना जशास तसं उत्तर मिळालं. (Congress Leader Ravneet Singh Bittu Asked About Absence Of PM Narendra Modi Reached Quickly After It In Loksabha)

नेमकं काय घडलं?लोकसभेत काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर आवाज उठवला. "लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विधेयकं मंजुर करण्यात आली. पण गरीबांचं नुकसान करणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर आणि घरगुती गॅसच्या महागाईवर कोणतीच चर्चा झाली नाही. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता संपत आलं आहे. पण आम्ही आता पंतप्रधानांना कुठे जाऊन भेटायचं? पंतप्रधान आहेत कुठे? आम्ही काय आता त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणूक रॅलीमध्ये जाऊन भेटायचं का?", असे सवाल उपस्थित केले. 

रवनीत सिंह यांच्या या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाचे खासदार अर्जुनराम मेघवाल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी याआधी लोकसभेत उपस्थित होते आणि लोकांना भेटण्यासाठी ते सदैव उपलब्ध असतात, असं मेघवाल म्हणाले. 

अचानक मोदी लोकसभेत पोहोचलेलोकसभेच्या सभागृहात जेव्हा रवनीत सिंह आणि अर्जुनराम मेघवाल यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीवरुन वाद सुरू असतानाच अचनाक पंतप्रधान मोदी सभागृहात पोहोचले. मोदींचं 'टायमिंग' पाहून सत्ताधारी एकदम खूष झाले आणि 'भारत माता की जय'चा जयघोष सभागृहात सुरू झाला. 

राहुल गांधीही उपस्थितअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहातील सर्व सदस्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची कोरोनातून लवकर मुक्ती होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१