भ्रष्टाचारप्रकरणी काँग्रेस नेते रशीद मसूद यांना जामीन
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:39+5:302015-02-16T21:12:39+5:30
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात गेल्या चार वर्षांपासून शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे नेते रशीद मसूद यांना सोमवारी जामीन मंजूर केला. या शिक्षेमुळे रशीद मसूद यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द झाले होते.

भ्रष्टाचारप्रकरणी काँग्रेस नेते रशीद मसूद यांना जामीन
न ी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात गेल्या चार वर्षांपासून शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे नेते रशीद मसूद यांना सोमवारी जामीन मंजूर केला. या शिक्षेमुळे रशीद मसूद यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द झाले होते.न्यायमूर्तीद्वय दीपक मिश्रा आणि प्रफुल्ल सी. पंत यांच्या खंडपीठाने ६८ वर्षीय काँग्रेस नेत्याची जामिनावर सुटका करताना त्यांना दोन लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रक्कमेची हमी देण्याचा आदेश दिला. याशिवाय त्यांच्यावर काही अटीही घालण्यात आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय ते दिल्ली आणि उत्तर प्रदेशबाहेर जाऊ शकणार नाहीत. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.