अहो, या दहा प्रश्नांची उत्तरंही द्या की; मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 08:15 PM2019-01-01T20:15:37+5:302019-01-01T20:21:32+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिल्यानंतर आता काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला आहे.

congress leader Randeep Surjewala questioning to narendra modi | अहो, या दहा प्रश्नांची उत्तरंही द्या की; मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेस आक्रमक

अहो, या दहा प्रश्नांची उत्तरंही द्या की; मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेस आक्रमक

Next

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिल्यानंतर आता काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना 10 मुद्द्यांवरून धारेवर धरले आहे. या 10 मुद्द्यांमध्ये प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख कधी जमा होणार, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक वक्तव्यात 'मी'पणा आहे. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले का?, काळा पैसा भारतात आला का?,

देशात रोजगाराचं प्रमाण वाढलं का?, भ्रष्टाचार आणि नक्षलवाद थांबला का? राफेल प्रकरण संयुक्त संसद समितीकडे दिलं का?, असे प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केले आहे. देशातील 9 कोटींपैकी 9 लाख तरी रोजगार उपबल्ध झाले आहेत काय, की हासुद्धा मोदींचा एक जुमलाच होता, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. नोटाबंदीमुळे किती काळा पैसा परत आला, त्याबद्दल मोदींनी मुलाखतीत काहीही सांगितलेलं नाही. जीसएटीमुळे व्यापाऱ्यांचा धंडा रसातळाला गेल्यानं अर्थव्यवस्थेला 3 लाख कोटींचा नुकसान झालं आहे. गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोदी कोट्यवधी पैसे खर्च करत आहेत, परंतु गंगा नदी अद्यापही प्रदूषितच आहे.




काँग्रेसनं उपस्थित केलेले 10 महत्त्वाचे मुद्दे

  • नोटबंदी
  • गब्बर सिंह टॅक्स
  • बँक फ्रॉड
  • काळा पैशावाल्यांची चंगळ
  • 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात केव्हा येणार
  • राफेलमधला भ्रष्टाचार
  • महागाई
  • राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ
  • शेतकऱ्यांचा प्रश्न
  • अच्छे दिन


     

Web Title: congress leader Randeep Surjewala questioning to narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.