'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:30 PM2021-11-12T15:30:20+5:302021-11-12T15:48:20+5:30

'हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहेत, भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला.'

Congress leader Rahul Gandhi targeted PM Narendra Modi over national security | 'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

Next

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारकडे सुरक्षेबाबत कोणतीही रणनीती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असून, सीमेवर प्राणाची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर सरकार खोट बोलत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

ट्विटरवर या संदर्भात पोस्ट करत त्यांनी लिहिले की, 'मोदी सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी गुन्हेगारी खेळ केला जात आहे. ते Mr. 56 इंच घाबरले आहेत. सरकार खोट बोलत आहे. माझ्या संवेदना आपल्या जीवावर खेळून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत आहेत', अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले.

'हिंदू धर्म आणि हिंदुत्व वेगळे आहेत' 

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज(शुक्रवार) पक्षाच्या डिजीटल 'जन जागरण अभियाना'चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व वेगवेगळ्या असल्याचं मत मांडलं. आज लोक हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला एकच समजू लागले आहेत. मात्र, वास्तवात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची काय गरज? भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला आहे. आमची विचारधारा ही प्रेम आणि बंधुभावाची आहे. 

भारतात काँग्रेसची विचारधारा गरजेची
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेस पक्षाची आणि एक आरएसएसची विचारधारा. आजच्या भारतात भाजप-आरएसएसने द्वेष पसरवला आहे आणि एकता, बंधुता आणि प्रेमाची काँग्रेसची विचारधारा भाजपच्या द्वेषी विचारसरणीने झाकोळली आहे, हे मान्य करावेच लागेल. 


 

Web Title: Congress leader Rahul Gandhi targeted PM Narendra Modi over national security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app