शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

'महागाईचा विकास'; इंधनदरवाढीवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका

By देवेश फडके | Updated: February 20, 2021 16:25 IST

गेल्या काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधनासह गॅसच्या किमतीही वाढत आहेत. महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींची पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकाइंधनदरवाढीवरून मोदी सरकारवर साधला निशाणाट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा घणाघात

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधनासह गॅसच्या किमतीही वाढत आहेत. महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. (congress leader rahul gandhi slams modi government over fuel price hike)

गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर देशाभरातील विविध मुद्द्यांवरून टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकारवर टीका केली. 'महागाईचा विकास', या दोनच शब्दांच्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या ट्विटसोबत वेगवेगळ्या हेडलाइन्स असलेला एक फोटोही शेअर केला आहे. 

'शुभ दिन' म्हणून घोषित करावा

दुसरीकडे, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी वाढलेल्या इंधनदरवाढीचा एक फोटो शेअर केला आहे. ''संपूर्ण आठवड्यात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, तो दिवस भाजप सरकारने 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा'', असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेसाठी हे 'महंगे दिन' ठरत आहेत, अशी खोचक टीकाही प्रियंका गांधी यांनी यावेळी केली आहे. 

महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते

महागाईचा सामान्य जनतेवर विशेष परिणाम होत नाही. महागाईमुळे जनता त्रस्त झालेली नाही. याची लोकांना आता सवय झाली आहे. सामान्य जनता गाडी घेऊन नाही, तर सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रमाणात वापर करते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झालेली नाही, असा दावा बिहारचे पर्यटनमंत्री नारायण प्रसाद यांनी केला आहे.

इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी

दरम्यान, सलग १२ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. देशभरात पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले. भोपाळमध्ये डिझेलने ८९.२३ रुपयांची आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९७ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८८.०६ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणInflationमहागाईPetrolपेट्रोलDieselडिझेलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार