शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'आजीने मला एकदा सांगितले होते की...; राहुल गांधींची सोनिया गांधींसाठी भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 12:31 IST

काँग्रेसला अखेर नवे अध्यक्ष मिळाले आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड अध्यक्षपदासाठी झाली आहे. अनेक वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.

नवी दिल्ली : काँग्रेसला अखेर नवे अध्यक्ष मिळाले आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड अध्यक्षपदासाठी झाली आहे. अनेक वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.  २३ वर्षे काँग्रेसची कमान सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांनी हे पद सोडले आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या कार्यकाळाची आठवण करून त्यांचे अनुभव सांगितले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांच्याबद्दल भावनिक ट्विट केले आहे.

राहुल गांधींच्या ट्विटमध्ये सोनिया गांधी त्यांचे दिवंगत पती राजीव गांधी यांचा फोटो दिसत आहेत. "आई, आजीने मला एकदा सांगितले होते की, तिला तुझ्यासारखी मुलगी कधीच होऊ शकत नाही. ती अगदी बरोबर होती, मला तुझा मुलगा असल्याचा अभिमान आहे.", असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

 

गांधी कुटुंबाला धक्का, दोन संस्थांचे परवाने रद्द! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा

सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांची मुलगी प्रियांका गांधी यांनीही इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. "...जग काहीही म्हणो किंवा विचार करो, मला माहित आहे, तू हे सर्व प्रेमासाठी केलेस." प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधींचा एक फोटो पोस्ट केला, यामध्ये दिवंगत राजीव गांधी यांचा फोटो दिसत आहे.

अध्यक्षपदाची सूत्र खर्गे यांच्याकडे दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेतृत्वाचीही मोठी जबाबदारी असल्याने मला दिलासा मिळाला आहे. मला मिळालेले प्रेम आणि आदर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेन आणि स्वीकारेन, पण हा सन्मान देखील खूप मोठी जबाबदारी होती. आज या जबाबदारीतून मुक्त होणार आहे. त्यामुळे साहजिकच मला दिलासा मिळाला आहे.", असं सोनिया गांधी म्हणाल्या. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस