शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून इंधनावर 68 टक्के कर आकारला जातो, तरीही राज्यांना दोष - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:09 IST

Rahul Gandhi : इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि करांसाठी काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

नवी दिल्ली : देशातील इंधन दरवाढीवरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल, डिझेल आणि इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि करांसाठी काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. तसेच, केंद्र सरकारचा संघराज्यवाद सहकारी नाही, जबरदस्ती आहे, असा आरोपही केला आहे. 

याबाबत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी ट्विट केले आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, इंधनाच्या वाढीव दरांसाठी राज्यांना दोष. कोळशाच्या कमतरतेसाठी (Shortage of Coal)राज्यांना दोष. ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल (Lack of Oxygen) राज्यांना दोष. केंद्र सरकार सर्व प्रकारच्या इंधनावर 68 टक्के कर आकारत आहे. तरीही पंतप्रधान जबाबदारी झटकतात. मोदींचा संघराज्यवाद सहकारी नाही, जबरदस्ती आहे.

मोदींची विधाने वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचा आरोपआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही इंधनावर जास्त कर लावल्याबद्दल काँग्रेस मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विधाने वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच, त्यांनी अशी मागणी केली आहे की, मोदी सरकारने आधी सेंट्रल एक्साईज ड्युटीचा हिशेब द्यावा, ज्यातून गेल्या 8 वर्षांत केंद्राला 27 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. 

राज्य सरकारांकडून अपेक्षा करणे अन्यायकारकराहुल गांधी पुढे म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलवर जमा होणारा 68 टक्के कर केंद्र सरकारला जातो. 32 टक्के राज्य सरकारकडे येतात. अशा परिस्थितीत जीएसटीच्या वाट्यापासून आधीच वंचित असलेल्या राज्य सरकारांकडून अपेक्षा करणे अन्यायकारक आहे.

मोदींकडून राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले होते की, युद्धाच्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. राज्यांनाही त्यांचे कर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFuel Hikeइंधन दरवाढcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी