शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' मुलींना भेटलो आणि...; राहुल गांधींनी स्वेटर न वापरण्याचे सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:29 IST

१०० हून दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रा सुरू आहे.

गेल्या १०० हून दिवसांपासून काँग्रेसचीभारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रा सुरू आहे.  सध्या भारत जोडा यात्रा उत्तर प्रदेशमधून पुढे गेली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये थंडीचे प्रमाण जास्त आहे, तरीही राहुल गांधी फक्त एका टी शर्टवरती आहेत. यावरुन चर्चा सुरू झाल्या आहेत. एवढ्या थंडीतही राहुल गांधी स्वेटर का वापरत नाहीत, यावरुन विरोधकांनी टीकाही केली. आज या संदर्भात स्वत: राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.   

एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी स्वेटर न वापरण्याचे कारण सांगितले आहे. 'मध्यप्रदेशमध्ये मी काही मुलींना भेटलो. या मुलींना भेटल्यानंतर मी भारत जोडो यात्रेत स्वेटर न वापरण्याचे ठरवले. यात्रेत फक्त टी शर्ट वापरण्याचे मी ठरवले, असंही राहुल गांधी म्हणाले. 

'मी केरळपासासून यात्रा सुरू केली. ज्यावेळी यात्रा सुरू केली तेव्हा गरमी होती. यात्रा मध्यप्रदेशमध्ये आली तेव्हा थंडी सुरू झाली. त्या  ठिकाणी मला एक दिवस तीन मुली भेटल्या, या मुलींना माझ्यासोबत फोटो काढायचा होता. त्यांचे फाटलेले कपडे होते, जेव्हा त्यांनी गळाभेट केली तेव्हा ते थंडीने कापत होते.तेव्हाच मी ठरवले, जोपर्यंत त्या मुलींना स्वेटर मिळत नाही तोपर्यंत मी स्वेटर वापरणार नाही, फक्त टी शर्ट वापरणार, असं राहुल गांधी म्हणाले. 

हो मी उपटसुंभ, पवार कुटुंब उपटून टाकणार; गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर पलटवार

भारत जोडो यात्रेवरुन राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका सुरु आहेत. या यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून झाली, पुढ ही यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आता ही यात्रा उत्तर प्रदेशमधून पंजाबकडे पोहोचली आहे.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा