काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या 'मनरेगा' (MNREGA) योजनेचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर जोरदार टीका केली आहे. मंगळवारी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले, ज्यात मनरेगाचे नाव बदलून 'विकसित भारत-जी राम जी योजना' असे करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट करत राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार आहे एक म्हणजे, 'गांधींचे विचार आणि दुसरे म्हणजे, गरिबांचा हक्क'.
मनरेगा म्हणजे गांधींच्या 'ग्राम-स्वराज'चे स्वप्न -राहुल गांधी म्हणाले, मनरेगा योजना ही महात्मा गांधींच्या 'ग्राम-स्वराज'च्या स्वप्नाचा जिवंत आविष्कार आहे. कोट्यवधी ग्रामीण लोकांच्या जीवनाचा आधार असलेली ही योजना कोविड काळात त्यांचे आर्थिक सुरक्षा कवच सिद्ध झाली. मात्र, पंतप्रधान मोदींना ही योजना नेहमीच खुपत राहिली आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून ते ती कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते मनरेगाचे नामोनिशान मिटवत आहेत.
मनरेगाचा आधार, रोजगाराचा हक्क, जो काम मागेल त्याला काम मिळेल, गावाला विकासाचे काम स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य आणि केंद्र सरकार मजुरीचा पूर्ण खर्च आणि साहित्याच्या खर्चाचा ७५% भार उचलेल, अशा तीन मूलभूत विचारांवर होता,
राहुल गांधी पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी याच मनरेगा योजनेत बदल करून सर्व शक्ती केवळ आपल्या हातात केंद्रित करू इच्छित आहेत. आता बजेट, योजना आणि नियम केंद्र सरकार ठरवेल, तर राज्यांना ४०% खर्च उचलण्यास भाग पाडले जाईल. एवढेच नाही तर, बजेट संपल्यावर किंवा पीक काढणीच्या हंगामात दोन महिने कोणालाही काम मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. एवढेच नाही तर, हे नवीन विधेयक महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान असून या विधेयकाचा विरोध गावातील गल्ल्यांपासून संसदेपर्यंत विरोध केला जाईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.
Web Summary : Rahul Gandhi criticizes Modi's government's plan to rename MNREGA, accusing Modi of disliking Gandhi's ideals and the poor's rights. He claims Modi weakens MNREGA, a vital rural employment scheme, by centralizing power and burdening states with costs, ultimately betraying Gandhian principles.
Web Summary : राहुल गांधी ने मनरेगा का नाम बदलने की सरकार की योजना की आलोचना की। उन्होंने मोदी पर गांधीवादी विचारधारा और गरीबों के अधिकारों को नापसंद करने का आरोप लगाया। उनका दावा है कि मोदी मनरेगा को कमजोर कर रहे हैं, जो सत्ता के केंद्रीकरण और राज्यों पर लागत का बोझ डालकर ग्रामीण रोजगार योजना है।