शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"सवयीप्रमाणे मोदीजींनी पुन्हा एकदा असत्याग्रह केला", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 20:47 IST

rahul gandhi : शुक्रवारी एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

ठळक मुद्देदेशात कृषी कायद्यांवरून घमासान सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. "सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला," अशी टीका करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना कृषी कायद्यांसंदर्भात सल्लाही दिला आहे. 

शुक्रवारी एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. "सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐका, कृषी कायदे मागे घ्या," असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, देशात कृषी कायद्यांवरून घमासान सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत आहे. १५-२० दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. कृषी कायदे मागे घेण्याची व हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कृषी कायदे एका रात्रीत आले नाहीत - मोदीमध्य प्रदेशातील शेतकरी संमेलनात शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नव्या कृषी कायद्यांवरुन विरोध करत असलेल्या विरोधीपक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या आश्वासनांची आठवण विरोधकांना करुन दिली. "जे काम खरंतर २५ वर्षांपूर्वी व्हायला हवे होते. ते आम्हाला आज पूर्ण करावे लागत आहे. कृषी कायदे काही एका रात्रीत तयार झालेले नाहीत. यावर गेल्या दोन दशकांपासून केंद्र, राज्य सरकार आणि संघटना चर्चा करत आहेत. आम्ही फक्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम करत आहोत", असे मोदी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस