शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

पीआरसाठी मोदींचे जवानांसोबत फोटोशूट, मग संरक्षण बजेटमध्ये वाढ का नाही?: राहुल गांधी

By देवेश फडके | Updated: February 1, 2021 21:24 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देसंरक्षण क्षेत्रातील तरतुदींवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीकाभारत-चीन सीमावादावरून पुन्हा राहुल गांधींचा निशाणाट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींचा थेट सवाल

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमावादावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. (Budget 2021 Latest News)

राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींवर भारत-चीन सीमावादावरून टीका केली आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे. आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. पीआरसाठी पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. त्यांच्याबरोबर फोटो काढतात. असे असताना संरक्षणाचे बजेट वाढवले का जात नाही? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. 

यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी किती तरतूद?

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी  ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रातील बजेटमध्ये सात हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी संरक्षणासाठी ४.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

Budget 2021 गरिबांच्या हातात काहीच नाही; देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हाती: राहुल गांधी

राहुल गांधींची अर्थसंकल्पावर टीका

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा जोरदार टीका केली. गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. 

भारत-चीन सीमेवर पुन्हा झटापट

भारत-चीन सीमेवर अलीकडेच पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यावरून अद्यापही लडाख सीमेवर अशांतता असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी तसेच सैन्य पातळीवर नऊ बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही. पँगाँग सरोवराच्या फिंगर फोरमधून चीन माघार घ्यायला तयार नाहीय. तोचा वादाचा मुख्य मुद्दा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापासून चीनने पूर्व लडाख सीमेवरील काही भागांमध्ये अतिक्रमण केले आहे. यावरून भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक संघर्ष झाला. मात्र, भारताच्या शूर जवानांनी चीनचे आव्हान तितक्याच ताकदीने परतवून लावले.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसindia china faceoffभारत-चीन तणावborder disputeसीमा वादDefenceसंरक्षण विभाग