शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Congres Priyanka Gandhi : “देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 13:27 IST

प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला.

शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली. राजघाटवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी पंतप्रधानांचा भ्याड असा उल्लेख करत टीकेचा बाण सोडला.

“या देशाचे पंतप्रधान भ्याड आहेत. माझ्यावर केस करा. मला तुरुंगात टाका… पण मी घाबरणार नाही. परंतु देशाचे पंतप्रधान भ्याड आहेत हेच सत्य आहे. आपल्या सत्तेमागे लपत आहेत. ते अहंकारी आहेत आणि या देशाची, हिंदू धर्माची जुनी परंपरा आहे की अहंकारी राजाला जनता उत्तर देते,” अशा शब्दात प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

“संसदेत माझ्या शहीद वडिलांचा अपमान झाला, शहीद पंतप्रधानांच्या मुलाला मीर जाफर म्हटलं जातं. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान होतो, पण यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” असं त्या म्हणाल्या.

३२ वर्षांपूर्वीच्या घटनेचा उल्लेख “१९९१ साली माझ्या वडिलांची अंत्ययात्रा त्रिमूर्ती भवनातून निघत होती. माझी आई, माझा भाऊ सोबत आम्ही गाडीत बसलो होतो आणि आमच्या समोर भारतीय सैन्याचा ट्रक होता. त्यावर माझ्या वडिलांचा पार्थिल होतं. थोड्या अंतरावर गेल्यावर राहुल म्हणू लागला की मला खाली उतरायचं आहे, तेव्हा सुरक्षेचा मोठा प्रश्न असल्याने आईनं नकार दिला. राहुल गाडीतून खाली उतरला आणि मागे जाऊ लागला. भर उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेमागे चालत इथपर्यंत पोहोचला. माझ्या भावानं माझ्या शहीद वडिलांचे अंत्यसंस्कार या ठिकाणापासून सुमारे ५०० यार्ड अंतरावर केले, ते चित्र आजही माझ्या मनात आहे,” असंही प्रियांका गांधी म्हणाल्या. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी