शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Lingayatism: कर्नाटकात राहुल गांधींनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा, पुढच्या वर्षी राज्यात होणार आहेत निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:43 IST

लिंगायत पंथ अथवा संप्रदाय हा संत बसवन्ना यांच्या सिद्धांतांवर चालणारा एक पंथ आहे. यात कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला लिंगायत पंथ स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे.

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लिंगायत पंथाची दीक्षा घेतली. कर्नाटकमधील चित्रदुर्गा येथे लिंगायत पंथाचा एक प्रसिद्ध मठ आहे. हा मठ मुरुगा मठ नावानेही ओळखला जातो. राहुल गांधी यांनी आज येथे मठाचे प्रमुख डॉ शिवमूर्ती मुरूगा शरणरू स्वामी यांची भेट घेतली. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मठाच्या मुख्यांनी त्यांना इष्टलिंग दीक्षा दीली आणि नियमाप्रमाणे, त्यांच्या डोक्यावर भभूताचे त्रिपुण्ड लावले.

राहुल गांधी यांना इष्टलिंग दीक्षा दिली जात असताना, मठाच्या वतीने, राहुल गांधी लिंगायत पंथाची दीक्षा घेत आहेत, हा एक एतिहासिक क्षण आहे, अशी घोषणाही  करण्यात आली. 

लिंगायत पंथ अथवा संप्रदाय म्हणजे? -लिंगायत पंथ अथवा संप्रदाय हा संत बसवन्ना यांच्या सिद्धांतांवर चालणारा एक पंथ आहे. यात कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला लिंगायत पंथ स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. या प्रक्रियेअंतर्गत इष्टलिंग दीक्षा ग्रहण करणाऱ्यांना लिंगायत पंथाचे मानले जाते.

कशा प्रकारे स्वीकारला जातो लिंगायत पंथ? - इष्टलिंग दीक्ष प्रक्रियेंतर्गत लिंगायत संत मंत्रोचारासह लिंगायत संप्रदाय स्वाकारणाऱ्या व्यक्तीस ईष्टलिंग धारण करायला सांगतात. यानंतर संबंधित व्यक्तीने लिंगायत पंथाचा स्वीकार केला  असे मानले जाते. इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर, राहुल गांधी यांनी ट्विट केले, की आपण ईष्टलिंग दीक्षा घेतली आहे, आपण भाग्यशाली आहोत आणि संत बसवन्ना यांच्यासंदर्भात आणखी जाणून घेण्याची आणि वाचण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत.

कर्नाटकच्या निवडणुका तोंडावर -महत्वाचे म्हणजे, कर्नाटकात 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. येथे लिंगायत पंथाचा मोठा प्रभाव आहे. तसेच कर्नाटकमध्ये लिंगायत पंथ हा भाजपची मोठी व्होट बँक आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटक