काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना धक्काबुक्की
By Admin | Updated: December 6, 2015 14:54 IST2015-12-06T14:50:23+5:302015-12-06T14:54:55+5:30
नवी दिल्लीत शनिवारी रात्री एका विवाहसोहळयामध्ये काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना धक्काबुक्की करुन त्यांच्याशी वादावादी करणा-या शिख युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना धक्काबुक्की
ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - नवी दिल्लीत शनिवारी रात्री एका विवाहसोहळयामध्ये काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना धक्काबुक्की करुन त्यांच्याशी वादावादी करणा-या शिख युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. सेहज उमंग भाटीया (२३) असे या युवकाचे नाव आहे.
दिल्लीच्या मेहरोली भागातील एका फार्महाऊसवर विवाहाच्या स्वागत समारंभासाठी टायटलर आले होते. त्यावेळी सेहजने टायटलर यांच्या दिशेने एक ग्लास फेकला व शिख विरोधी दंगलीसाठी त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याशी वाद घातला. जगदीश टायटलर १९८४ साली दिल्लीत शिखां विरुध्द झालेल्या दंगल प्रकरणातील आरोपी आहेत.